Sunday, November 17, 2024

/

पावसाची संततधार, मात्र पूरपरिस्थिती नाही : जिल्हाधिकारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. नदी – नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे मात्र बेळगाव जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहे. आज बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

मुसळधार पावसामुळे कृष्ण नदी पाणी पातळीत वाढ झाली असली तरी जिल्ह्यासमोर पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. परंतु पावसाचे प्रमाण पाहता सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी, पूर परिस्थिती या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यात जाऊन भेट देऊन, व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.

संततदार पावसामुळे खबरदारीच्या उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात ४२१ निवारा केंद्रे स्थापन करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.Bgm dc flood

पुरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना सर्वसमावेशक माहिती देण्यात आली असून संभाव्य पूर व्यवस्थापनासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

नदीतीरावरील खालच्या पातळीवरील पूल जेव्हा पाण्याखाली जातात, त्यावेळी सतर्क राहण्यासाठी फलक लावले जात असून अशा ठिकाणी नागरिकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात येते. सततच्या होणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.