Saturday, January 4, 2025

/

फुटपाथ शेजारी वास्तव्य केलेल्या लोकांची निवारा केंद्रात रवानगी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिका आणि रेल्वे पोलिस (जीआरपी) वेगवान आणि समन्वित प्रयत्नातून रेल्वे स्थानकाबाहेरील फूटपाथवर तंबू टाकून वास्तव्य केलेल्या भटक्या लोकांचे सरकारी निवारा केंद्रात सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे.

सदर उपक्रमाचे नेतृत्व बेळगाव महापालिकेचे सीएओ प्रकाश मरकट्टी आणि डे नुल्म शू निवारा समन्वयक यांनी केले. रेल्वे पोलिसाचे (जीआरपी) देखील या स्थलांतर प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या पद्धतीने ज्या लोकांनी तंबू बांधून फूटपाथ शेजारी आश्रय घेतला होता, त्यांना अधिक योग्य ठिकाणी हलवण्याद्वारे सर्वांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण सुनिश्चित करण्यात आले.

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, आणि गौतम श्रॉफ यांच्यासह बेळगाव महापालिका पथकाच्या प्रयत्नांमुळे हे स्थलांतर शक्य झाले. हा उपक्रम बेळगावची स्वच्छता राखण्यासाठी आणि येथील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची महानगरपालिकेची बांधिलकी दर्शवितो.

रस्त्यावर किरकोळ साहित्याची विक्री करणाऱ्या परगावच्या गरीब भटक्या लोकांकडून बेळगाव रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे पोलीस जीआरपी कार्यालयाजवळ रस्त्याशेजारी तंबू टाकण्यात आले आहेत. हे लोक फूटपाथवर उघड्यावर झोपत होते. त्यांची मुले रस्त्यावरच शौचाला बसत होती.Footpath shelter

त्यामुळे अस्वच्छता निर्माण होण्याबरोबरच सध्या पडणाऱ्या पावसामुळे संबंधित लोकांची दुरवस्था झाली होती. त्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता होती. आमचं बेळगाव खूप सुंदर ठिकाण आहे. पाहुणे बेळगावला येतात तेव्हा रस्त्या शेजारी तंबूत राहणाऱ्या या लोकांमुळे आपल्या बेळगाव शहराबद्दल वाईट छाप पाडते. ही बाब सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिली.

तसेच म्हणून सरकारने ते काढून त्या लोकांना शासकीय निवारागृहात हलवावे, अशी विनंती त्यांना केली होती. सदर विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उपरोक्त स्थलांतराची कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, शहर परिसरातील एखाद्या असहाय्य व्यक्तीला आश्रयाची गरज असल्यास त्याला त्याच्या परवानगीने जुने बेळगाव येथील सरकारी निवारा केंद्रात हलवण्याची जबाबदारी फेसबुक फ्रेंड्स सर्कलने उचलली आहे. तरी या संदर्भात संबंधितांनी आपल्या +919986809825 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संतोष दरेकर यांनी केले आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.