बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात फूटपाथवर बेकायदा व्यवसाय थाटलेल्या चहा व अन्न पदार्थ विक्रिच्या टपर्या व पान टपर्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या वर पालिकेने कारवाई करत पाच टपऱ्या हटवल्या आहेत.
महापालिकेने सहा महिन्यांनंतर पुन्हा अतिक्रमण निर्मूलन मोहिम वाढवली असून स मंगळवारी अतिक्रमण केलेल्या पाच टपर्या हटवण्यात आल्या.
बेळगाव शहरात महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेनुसार शहरातील अतिक्रमणे हटवण्यात येत आहेत. मंगळवारी क्लब रोड परिसरातील पाच टपर्या हटवण्यात आल्या. शहरात व्यापार करण्यासाठी फेरीवाल्यांना भू-भाडे भरावे लागते.
या व्यापारासाठी महापालिकेने जागा निश्चित केल्या आहेत. पण, अनेक ठिकाणी विना परवाना दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. आता ही अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
क्लब रोडवरील अतिक्रमणे हटवून त्या टपर्या सदाशिवनगर स्मशानभूमीजवळील महापालिकेच्या वाहन विभागात ठेवण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने हनुमाननगर परिसरातील अतिक्रमणे हटवली होती.
त्यावेळी काही प्रमाणात राजकीय हस्तक्षेप करण्यात आला होता. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या कारवाईत सातत्य ठेवावे अशी मागणी करत आहेत.