Sunday, January 26, 2025

/

चोरीला गेलेल्या 10 दुचाकी जप्त; दोघांना अटक

 belgaum

बेळगाव लाईव्ह:टिळकवाडी आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये घडलेल्या दुचाकी चोरींच्या प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघा चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्याकडील 7 लाख रुपये किमतीची एकूण 10 दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

बेळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडलेल्या दुचाकी चोरींच्या प्रकरणासंदर्भात शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग तसेच पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व सहाय्यक पोलीस आयुक्त हेज शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या

पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज बुधवारी आरोपी हैदरअली मुस्लिमअली शेख (रा. वीरभद्रनगर, बेळगाव) आणि नदीम शमशुद्दीन टोपगार (रा. अमननगर, बेळगाव) या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा क्र. 72 /2024 भा.द.वि. कलम 379, 411 अन्वये गुन्हा दाखल केला.Tilkwadi

 belgaum

तसेच आरोपींकडून टिळकवाडी आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत चोरीला गेलेल्या 9 दुचाकी व त्या चोरण्यासाठी वापरलेली आणखीन एक दुचाकी अशा एकूण 7 लाख रुपये किंमतीच्या 10 दुचाकी आज जप्त केल्या आहेत. या दुचाकीमध्ये 3 मोटरसायकली आणि ॲक्टिवा वगैरे 7 स्कूटरचा समावेश आहे.

सदरच्या कारवाईबद्दल टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई, हेड कॉन्स्टेबल गळात महेश पाटील, सोमलिंग कर्लिंगनावर, संजू संगोटी, मल्लिकार्जुन पात्रोट, लाडजीसाब मुल्तानी आणि तांत्रिक विभागाचे रमेश अक्की यांना पोलीस आयुक्तांनी शाबासकी देऊन बक्षीस जाहीर केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.