Sunday, January 5, 2025

/

2 जुलैला होणार मनपा स्थायी समित्यांची निवडणूक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेच्या 22 व्या कालावधीसाठी चारही स्थायी समित्यांच्या सदस्यांची निवडणूक येत्या 2 जुलै रोजी होणार असल्याची माहिती महापालिका स्थायी समिती निवडणूक अध्यक्षाधिकारी असणारे प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्ट्यण्णावर यांनी दिली आहे.

बेळगाव महापालिकेच्या सभागृहात येत्या मंगळवार दि. 2 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत विविध स्थायी समित्यांच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करून घेतली जातील.

त्यानंतर दुपारी 3 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी माहिती महापालिका स्थायी समिती निवडणूक अध्यक्षाधिकारी एस. बी. शेट्ट्यण्णावर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.