बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील राणी चन्नम्मानगर सेकंड स्टेज येथे आज बुधवारी सकाळी रस्त्या शेजारील विजेच्या खांबावर एक घोरपड आढळून आल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
राणी चन्नम्मानगर सेकंड स्टेज येथे आज सकाळी रस्त्याशेजारील खांबावर मोठा सरडा चढून बसल्याचे स्थानिक नागरिकांना पहावयास मिळाले. तथापि जवळजवळ पाहता ती घोरपड असल्याचे निदर्शनास येतात काही उत्साही मंडळींनी त्या घोरपडीचे फोटो व व्हिडिओ काढून घेतले.
याबाबतची माहिती पशुप्रेमी सामाजिक कार्यकर्ता अवधूत तुडवेकर याला मिळताच त्याने घटनास्थळी जाऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरम्यान ती घोरपड तेथून नाहीशी झाली होती. या संदर्भात तुडवेकर यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता त्यांनी संबंधित परिसरात घोरपडीचा वावर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
मात्र अद्याप आपल्याला ती सापडली नसल्याचे त्यांनी सांगितले. चन्नम्मानगर सेकंड स्टेज परिसर हा व्हॅक्सीन डेपोच्या आसपास असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहेत. या नैसर्गिक अधिवासात ती घोरपड नाहीशी झाली असावी असा कयास आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि नारू निलजकर यांनी या भागाला भेट देत शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान वन खात्याला देखील याची माहिती देण्यात आली आहे.