बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्याने शनिवारी विक्रीकर सुधारित केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत.
राजपत्रातील अधिसूचनेनुसार, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर अनुक्रमे 29.84% आणि 18.44% ने सुधारित केला आहे. पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननुसार, कर्नाटकमध्ये पेट्रोलच्या किमती ३ रुपये आणि आणि डिझेल 3.05 ने वाढ झाली आहे.
दरवाढ झाल्यानंतर बेंगळुरू येथे पेट्रोलचा दर 102.८४ रुपये प्रति लीटर झाला आहे तर डिझेल प्रति लिटरची किंमत 88.95 इतकी झाली आहे.
राज्यासाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कर्नाटकच्या वित्त विभागाने हा निर्णय घेतला आहे. तथापि, वाहतूक आणि वस्तूंच्या वितरणासह विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.