बेळगाव लाईव्ह :काही दिवसांपूर्वी महापालिकेवर अचानक छापा टाकलेल्या लोकायुक्त अधिकार्यांनी मंगळवारी (दि. 11) तुरमुरी येथी महापालिकेच्या कचरा डेपोची पाहणी करून सविस्तर अहवाल घेतला.
शहरातील कचरा संकलन करून तुरमुरी येथील डेपोत प्रक्रिया करण्यात येते. रोज अडीच ते तीनशे टन कचरा संकलन करण्यात येते. त्यावर हैदराबाद येथील रिसस्टेनिबिलीटी लिमिटेड कंपनीकडून प्रक्रिया करण्यात येते.
या सार्या प्रक्रियेची लोकायुक्तांकडून माहिती घेण्यात आली. राज्याच्या उपलोकायुक्तांनी सर्व कचरा प्रकल्पांची पाहणी करून अहवाल देण्याची सूचना स्थानिक अधिकार्यांना दिली आहे.
त्यानुसार आज लोकायुक्त पोलिस प्रमुख हणमंत राय यांच्या नेतृत्वाखाली माहिती घेण्यात आली.
पाहणीवेळी महापालिका अधिकार्यांना बोलावून घेण्यात आले होते. त्यांच्याकडून सर्व माहिती घेण्यात आली. तुरमुरी कचरा डेपोत चांगल्या प्रकारे काम सुरू आहे, अशी माहिती लोकायुक्तांनी दिली आहे.