बेळगाव लाईव्ह : दूध वाहून ट्रकने पाठीमागच्या बाजूने कॉलेज बसला दिलेल्या धडकेत बसमधील 16 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर बेळगाव येथील बीम्स आणि लेक व्यु इस्पितळात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भुतरामहट्टीजवळ कॉलेज बस आणि ट्रक मध्ये हा अपघात घडला आहे.
कोल्हापूर येथील डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाचे 40 विद्यार्थी या बसमधून प्रवास करत होते. जखमी विद्यार्थ्यांवर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात लेक व्यू इस्पीतळात उपचार सुरू आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर येथील डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी धारवाड विद्यापीठाच्या सहलीवर आले होते. त्यावेळी बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाजवळील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देऊन कोल्हापूरला परतत असताना हा अपघात घडला.
अपघातात कोल्हापूरचे 16 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर घटना काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
गुन्हे आणि रहदारी विभागाच्या डीसीपी पी स्नेहा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अपघातात किरकोळ जखमी विद्यार्थ्यांवर बिम्स आणि लेक व्ह्यू मध्ये उपचार सुरू आहेत .