बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल झालेल्या शमा यांनी आपल्या बाजूच्या बेडवर असणाऱ्या लहान बाळ आणि तिच्या आईवर उपचार करून आपल्या घरी नेऊन त्यांच्यावर उपचार काम जातीधर्मापेक्षा माणुसकीचा धर्म मोठा आहे हे दाखवून दिले आहे.
गंभीर आजाराने त्रस्त असणार्या मातेने जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहात बाळाला जन्म दिला. मात्र, मातेसह बाळाची प्रकृती नाजूक असल्याने एका मुस्लिम दांपत्याने दोघांनाही आपल्या घरी नेऊन त्यांच्यावर उपचार केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मातेसह मुलाला घरी पाठवून दिल्याने मुस्लिम दांपत्याने दाखवलेल्या या माणुसकीबाबत पोलीस खात्याच्यावतीने त्यांचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.
14 एप्रिल रोजी दंडापूर (ता.गोकाक) येथील आजाराने त्रस्त असलेल्या शांतवा नामक मातेने जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात मुलाला जन्म दिला. पण ते अर्भक आजारी होते. शेजारच्या बेडवर असलेल्या शमा रिजवान देसाई यांनी शांतव्वा आणि नवजात शिशुवर उपचार केले. तसेच शमा दांपत्याने आई शांतव्वा आणि मुलाला गोकाक येथील आपल्या घरी नेले आणि ते पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची काळजी घेतली. माता आणि मुलाची मानवतेच्या दृष्टिकोनातून सांभाळ करणार्या मुस्लिम दांपत्याचे कार्याचे कौतुक केले जात आहे.
जातीधर्मा पलीकडचं नातं जपत क्षमा आणि रिजवान या दोघांनी माणुसकीचा धर्म मोठा करण्याचं काम केलेला आहे.दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. ही माहिती समजताच आज मार्केट पोलिसांनी त्या मुस्लिम दांपत्याचा सत्कार करून कौतुक केले.
पूर्वीच्या काळापासून जात-धर्मात युद्धे होत असली तरी आईच्या प्रेमाला जातीपातीचा भेद नाही. आईचे प्रेम , करुणा , वात्सल्य अमूल्य आहे. बेळगाव जिल्हा रुग्णालयातील एका घटना कोणत्याही धर्मातील असो प्रत्येकामध्ये माणुसकी असते हेच दाखवून देणारी आहे