बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात विविध ठिकाणी अपघातांची मालिका सुरूच आहे. एकीकडे रहदारी पोलिसांची सक्तीची कारवाई, खड्डेमय रस्ते, अपघात टाळण्यासाठी करण्यात येणारी जनजगृती, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीचे नियम आणि अटी या सर्व गोष्टी एकीकडे सुरूच आहेत.
मात्र यातून धडा घेऊन सुजाण नागरिक म्हणून वाहतुकीचे नियम पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु काही तरुण आणि अनेक दुचाकीधारक वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवतात.
वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात आणि पुढे अनुचित प्रकार घडला कि याचा दोष मात्र यंत्रणेला देतात. असेच काहीसे प्रकार टिळकवाडी भागात पाहायला मिळत आहेत.
टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेट नजीक बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. याचप्रमाणे पुढील काही भागात देखील बॅरिकेड्स घालून वाहतूक वळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
परंतु काही दुचाकीधारक चुकीच्या मार्गाने वेगाने वाहने चालविताना दिसून येत असून अशा दुचाकीधारकांवर कडक आणि सक्तीची कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.