बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजयोत्सव साजरा होत असताना पाकिस्तानच्या जयजयकाराच्या घोषणा देणाऱ्या एकाला पोलिसांनी गजाआड केले आहे.
जमीर नाईकवाडी (वय 25) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल काल मंगळवारी मंगळवारी जाहीर झाले.
त्यामध्ये चिक्कोडी मतदारसंघात काँग्रेसने मोठा विजय प्राप्त केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदारपणे विजयोत्सव साजरा केला. त्यावेळी आरोपी जमीर हा पाकिस्तान की जय! अशी घोषणा देत होता.
सदर बाब निदर्शनास येतात पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.