Friday, January 3, 2025

/

बेळगाव विमानतळावर उभे राहणार नवे क्षितिज

 belgaum

बेळगाव लाईव्ह :जागतिक दर्जाच्या टर्मिनल्ससह प्रवाशांच्या प्रवास अनुभवात क्रांती घडवून आणण्याचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) सातत्याने प्रगती करत आहे.

आता बेळगाव विमानतळ देखील नियोजित नवीन टर्मिनल इमारतीसह विमानचालन तेजस्वीतेचा नवा अध्याय सुरू करण्यास सिद्ध झाले आहे. हा अंदाजे 322 कोटी रुपये गुंतवणूकीचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दशकभरातील नेतृत्वाने देशातील भविष्यकालीन पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. यामुळे भारतातील नागरी उड्डयन केंद्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असून वेगाने वाढ झाली.

बेळगाव हे विकास आणि संधी असलेले शहर आहे, जे त्याच्या भरभराटीच्या औद्योगिक क्षेत्रासाठी आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांसाठी ओळखले जाते. वाढती मागणी आणि उन्नत प्रवाशांचा अनुभव पाहता बेळगाव विमानतळाची 16000 चौरस मीटरमध्ये पसरणारी नियोजित नवीन टर्मिनल इमारत 322 कोटी रुपये खर्चून बांधण्याचा प्रस्ताव आहे.Airport runway

सदर नवी टर्मिनल इमारत 32 चेक इन काउंटर, 4 एरोब्रिज, 9 एक्सबीआयएस मशिन्स, 3 अराईव्हल कॉव्हेयर बेल्टसह इतर प्रमुख वैशिष्ट्यांसह सुसज्ज असणार आहे. पर्यावरणपूरक नवीन टर्मिनल इमारत गर्दीच्या वेळेत 2400 प्रवाशांना आणि दरवर्षी 35 लाख प्रवाशांना सेवा देण्यास सक्षम असेल.

नवीन टर्मिनल इमारतीचे डिझाईन आणि अंतर्गत भाग कर्नाटकच्या समृद्ध स्थापत्य वारश्याचे दर्शन घडवेल. कारण मंदिर वास्तुकलेची झलक तिच्या स्तंभांमध्ये आणि छतामध्ये टिपली जाणार आहे. कनेक्टिव्हिटी वाढ, पर्यावरण आणि समृद्धी वाढवण्याच्या वचनबद्धतेसह बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.