बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी तिसऱ्या रेल्वेगेटनजीक घडलेल्या अपघातात सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणारा राहुल गजानन हणमंताचे हा युवक गंभीररीत्या जखमी झाला.
या तरुणावरील उपचाराचा खर्च मोठा असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनानंतर समाजातील अनेक दानशूर व्यक्तिमत्व तसेच सर्वसामान्य नागरिकांचे हात देखील सरसावले आहेत.
हलगा या गावचा तरुण गेल्या रविवारी टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे गेटनजीक घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. आपल्या दुचाकीवरून जात असता दुसऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याला जबर धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी राहुल याच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सदर युवक गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्याच्यावरील उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च मोठा आहे. हा खर्च हणमंताचे कुटुंबाला पेलवणारा नाही. यासाठी जखमी राहुलचा भाऊ आणि हणमंताचे कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील आणि बेळगावमधील नागरिक आणि युवकांनी आपल्या परीने होईल तितकी मदत करण्यास सुरुवात केली आहे.
अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या राहुल गजानन हणमंताचे या तरुणावर अद्यापही उपचार सुरूच आहेत. तथापि उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संघ -संस्थांनी हनुमंताचे कुटुंबीयांशी संपर्क साधून अथवा +91 8088521142 या पे नंबरवर आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन राहुल हणमंताचे याच्या हितचिंतकांनी केले आहे.