बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील डॉ. आंबेडकर उद्यान व वनिता विद्यालयानजीक मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीची दुरुस्ती केली जात असून हे काम आज सोमवारी पूर्ण केले जाणार असल्यामुळे उद्या मंगळवारपासून बेळगाव उत्तर विभागात सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती एल अँड टी कंपनीने दिली आहे.
शहरात दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर उद्यानाजवळ नवी जलवाहिनी घालण्यात आली आहे. वनिता विद्यालयाजवळ देखील नवीन जलवाहिनी घालण्याचे काम काल रविवारी सुरू झाले असून ते आज सोमवारी आटोपणार आहे.
त्यानंतर मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा करून चांचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे बेळगाव उत्तर विभागातील कांही भागात आज सोमवारी अल्प प्रमाणात पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
तथापि उद्या मंगळवारपासून उत्तर विभागातील गोंधळी गल्ली, कंग्राळ गल्ली, गणाचारी गल्ली, रिसालदार गल्ली, काकतीवेस गल्ली, नार्वेकर गल्ली, गवळी गल्ली, समादेवी गल्ली, केळकर बाग, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, बापट गल्ली, बुरुड गल्ली, कडोलकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, अनुसुरकर गल्ली, महादेव गल्ली, मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, बसवान गल्ली,
काकतीवेस रोड, खडेबाजार, गणपत गल्ली, भोवी गल्ली, पांगुळ गल्ली, भातकांडे गल्ली, खडक गल्ली, कचेरी रोड, जालगार गल्ली, बागवान गल्ली, कोतवाल गल्ली, भेंडीबाजार, कसाई गल्ली, टेंगीनकेरा गल्ली,
दरबार गल्ली, चावी मार्केट, मेणसी गल्ली, माळी गल्ली, कामत गल्लीसह सदाशिवनगर, डॉ. आंबेडकरनगर, पोलीस वसाहत आश्रय कॉलनी, कंग्राळी बी. के. आश्रय कॉलनी, आझाद खान सोसायटी, टीव्ही सेंटर, हनुमाननगर आणि कुमारस्वामी लेआउट या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.