बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील उद्यमबाग आणि मार्केट पोलीस ठाण्यातील २ विविध गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
बेळगाव शहरांतर्गत येणाऱ्या उद्यमबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार निवृत्त पीएसआय एस. आर. कुलगोड यांनी तपास हाती घेत आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
अब्दुलगनी शब्बीर शेख (वय २५, रा. नाथ पै नगर, अनगोळ, बेळगाव) या आरोपीवरील दोषारोपपत्र सिद्ध झाले असून त्याला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचप्रमाणे मार्केट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत निवृत्त पीएसआय अशोक यरगट्टी यांनी तपासपत्र हाती घेत शुभम बाळू हदगल (20), सागर बाळू प्रधान (२४), महेश गुंडू पाटील (19) , युवराज दिलीप पवार (23), मारुती प्रकाश पाटील (२६), विक्रम पांडुरंग मुतगेकर (२८), इरण्णा सिद्धलिंग बागेवाडी (21) सर्वजण राहणार महाद्वार रोड, बेळगाव अशा एकूण ७ जणांवर दोषारोप सिद्ध झाले आहेत.
यातील सहा जणांना प्रत्येकी ७००० रुपये दंड तसेच इरण्णा सिद्धलिंग बागेवाडी या आरोपीला ४ वर्षांची शिक्षा तसेच ७५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
याप्रकरणी याडा मार्टिन मारबानयांग, पोलीस आयुक्त, आयपीएस, डीसीपी (सी अँड एस), डीसीपी (ए अँड एस), बेळगाव शहर यांनी या प्रकरणाचा सुनियोजित आणि उच्च दर्जाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे, चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.