बेळगाव लाईव्ह :शिवउत्सवानिमित्त विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतींचे गुरुवार दि. 9 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून धर्मवीर संभाजी चौक येथे मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे.
धर्मवीर संभाजी चौकातील शिवज्योतींच्या स्वागत समारंभानंतर शिव उत्सव अनुषंगाने सकाळी ठीक 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन वआरती करण्यात येईल.
तसेच सकाळी 10 वाजता छ. शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येईल.
तरी या कार्यक्रमांना सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने अध्यक्ष दीपक दळवी, कार्यवाह मदन बामणे कार्यवाह विजय पाटील तसेच जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व शिवराज पाटील यांनी केले आहे.