बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह: नळाला पाणी आलेले असताना पाणी भरण्यासाठी टाकीचे झाकण खुले करण्यात आले होते त्या टाकीत पडून बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील कंग्राळ गल्लीत रविवारी सायंकाळी घडली आहे.साहिशा संदीप बडवानणाचे वय अडीच वर्षे असे मयत झालेल्या या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार नळाला पाणी आलेले असताना मयत सहिशा यांच्या आईने टाकीचे झाकण खुले करून ठेवले होते इतर कामात व्यस्त झाली होती त्यावेळी सदर बालिका टाकीत पडली आणि त्यात तिचा गुदमरून मृत्यू झाला.
टाकीचे झाकण उघडुन त्या बालिकेची आई पहिल्या माळ्यावर गेली होती खाली असलेल्या बालिका कधी टाकी कडे गेली तिच्या आईला कळालेच नाही
सदर बालिका खेळत खेळत खुल्या असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पडली टाकीत भरलेल्या पाण्यात गुदमरून बेहोश झाली होती. तातडीने पाण्यातून बाहेर काढून तिला उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पाण्याच्या टाकीत पडून लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना वेळोवेळी घडत असतात मात्र अजूनही पालकानी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.खडे बाजार पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.