बेळगाव लाईव्ह :राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट’ (एचएसआरपी) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आता येत्या 31 मे पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट लावून घेण्यासाठी याआधी 17 नोव्हेंबर 2013 आणि त्यानंतर फेब्रुवारी 2014 पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. मात्र आता येणारी 31 मे ही अखेरची तारीख असणार आहे.
अन्यथा एचएसआरपी नसलेल्या वाहनांच्या चालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन मंडळाकडून आरटीओ आदेश जारी करण्यात आला आहे. एचएसआरपी नंबर प्लेट कायमस्वरूपी ओळख क्रमांक होलोग्रामसह अनेक नवीन वैशिष्ट्यांनी तयार करण्यात आली आहे.
या नंबर प्लेटमध्ये कोणतीही छेडछाड करता येणार नाही. वाहन चालकांनी सदर नंबर प्लेट येत्या 31 मे पर्यंत आपल्या वाहनांवर लावून घ्यावी अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी वाहन चालकांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली असल्यामुळे यापुढे मुदत वाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुदतीत एचएसआरपी प्लेट बसविण्यात न आल्यास अशा वाहन चालकांविरुद्ध 500 ते 1000 रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.