बेळगाव लाईव्ह :देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या शनिवार दि. 18 ते सोमवार दि. 20 मे 2024 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उद्यमबाग परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
उद्या शनिवारपासून सोमवारपर्यंत चेंबर ऑफ कॉमर्स, गुरु प्रसाद कॉलनी, डच इंडस्ट्रियल अँड बेम्को इंडस्ट्रियल फीडर्स, जैन इंजीनियरिंग, एचपी पेट्रोल पंप, चेंबर ऑफ कॉमर्स, पुसाळकर एचडी, कॉमर्स न्यू, जयनेश्वर इंडस्ट्रीज येथील फिडर्स खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रभावित असणार आहेत.
परिणामी राणी चन्नम्मानगर, फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज, बुडा लेआउट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, उद्यमबाग पोलीस स्टेशन, अनगोळ भाग,
यार्बल प्रिंट, एअरटेल टॉवर, माणिकबाग शोरूम, देशपांडे सेलिब्रेशन हॉल, चेंबर ऑफ कॉमर्स रोड सर्व्हो कंट्रोल, व्हेगा, पार्वती मेटल, कामाक्षी इंजिनिअरिंग, मारुती मेटल वगैरे ठिकाणी उपरोक्त दिवशी दिवसभर वीज नसणार आहे.
सदाशिवनगरमध्ये रविवारी वीज खंडित
दुरुस्तीच्या कारणास्तव सदाशिवनगर परिसरातील वीज पुरवठा येत्या रविवार दि. 5 मे 2024 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत खंडित केला जाणार आहे.
सदाशिवनगर येथील 33/11 केव्ही पॉवर डिस्ट्रीब्युशन स्टेशनमध्ये समाविष्ट असलेल्या एफ-1 कुमार स्वामी लेआउट, एफ-2 हनुमाननगर, एफ-3 सह्याद्रीनगर, एफ-4 पाणी पुरवठा या क्षेत्रातील वीज पुरवठा रविवारी खंडित असणार आहे.