Tuesday, December 24, 2024

/

जीवन -मृत्यूच्या रेषेवरील रोहितसाठी मदतीचे आवाहन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:पाच वर्षांपूर्वी आईचे कॅन्सरने निधन तर वडील सध्या अर्धांगीचा झटका येऊन आजारी आहेत. अशा परिस्थितीमध्ये रोहित कृष्णा शहापूरकर (वय 28, रा. कल्लेहोळ) अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्या उपचारासाठी माणुसकीच्या दृष्टीने तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे.

बेळगाव -वेंगुर्ला मार्गावरील सुळगा (हिं) गावाजवळील पेट्रोल पंप नजीक काल मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास एका ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी वरील रोहित शहापूरकर याला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रोहित याला त्वरेने केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अतिदक्षता विभागातील या उपचारांसाठी मोठा खर्च येणार आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर तातडीने त्याच्यावर जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तो जीवन -मरणाशी झुंज देत आहे.

निधन पावलेली आई, अंथरुणाला खिळून असलेले वडील आणि घरची बेताची परिस्थिती लक्षात घेता ड्रायव्हिंग करून घरचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या जखमी रोहित वरील उपचारासाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे.Rohit

माजी सुळगा ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलसह अन्य सामाजिक संघटना रोहितच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या असल्या तरी उपचाराचा मोठा खर्च लक्षात घेता सेवाभावी संस्थांनी आणि नागरिकांनी खालील दिलेल्या बँक खात्यामध्ये रोहितच्या उपचारासाठी शक्य होईल तितकी आर्थिक मदत करावी, असे आवाहन माजी ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह कल्लेहोळ ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

रुग्णाचे नाव : रोहित कृष्णा शहापूरकर, खातेदार नांव : सुरज रमेश शहापूरकर, बँक : युनियन बँक ऑफ इंडिया, आरपीडी कॉलेज, टिळकवाडी बेळगाव. खाते क्र. 527802010011719. आयएफएससी : युबीआयएन 0552780.

संजय पाटील कल्लेहोळ : +91 94483 40028

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.