Thursday, December 19, 2024

/

सामाजिक कार्यकर्ते विश्वास धुराजी यांचा अमृतमहोत्सव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी कुटुंबियांच्या वतीने विश्वासराव धुराजी यांचे औक्षण करून केक कापण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे हे होते. यासह माजी महापौर मालोजी अष्टेकर आणि चव्हाट गल्लीचे सरपंच प्रतापराव मोहिते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रवीण जाधव, उत्तम नाकाडी, चंद्रकांत कनबरकर, किसनराव रेडेकर, सुनील मेलगे, उदय किल्लेकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, राजेश नाईक, शंकर किल्लेकर, विश्वजीत हसबे आदी स्वागत कमिटीच्या वतीने आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रा. विनोदिनी मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले.

याचप्रमाणे उपस्थित अनेक मान्यवरांनी विश्वासराव धुराजी यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रणजित चव्हाण पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.Dhuraji

यावेळी सत्कारमूर्ती विश्वासराव धुराजी यांचा चव्हाट गल्ली, जालगार मारुती मंदिर देवस्थान समिती, ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. बेळगाव आणि परिसरातील अनेक सामाजिक संस्था, बँक, सार्वजनिक युवक, महिला मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवाराच्या वतीनेही विश्वासराव धुराजी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विश्वासराव धुराजी यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने हितचिंतकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा मंडळ शाळेचे शिक्षक हसबे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.