Sunday, September 8, 2024

/

समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा उत्साह.. आणि मराठीसाठी तळमळ…

 belgaum

बेळगाव लाईव्ह : समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांनी आज हजारो मराठी भाषिक प्रेमींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बेळगावमधील हजारो मराठी भाषिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. यावेळी मिरवणुकीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या महादेव पाटील यांच्यासमवेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते तसेच महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.

यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मराठी भाषेवर आणि मराठी भाषिकांवर सीमाभागात होणारे अत्याचार याविरोधात मतदानाच्या माध्यमातून चोख प्रत्त्युत्तर देण्याचा चंग महिलांनी बांधला. यावेळी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना माजी उपमहापौर रेणू किल्लेकर म्हणाल्या, मराठी माणसाची ताकद आज रस्त्यावर एकवटली आहे.

एकीकडे गर्दी जमविण्यासाठी राष्ट्रीय पक्ष पैसे खर्च करत आहे. परंतु महाराष्ट्र एकीकरण समिती पैशाच्या जोरावर नव्हे तर स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीसाठी एकवटली आहे. आज महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व मराठी भाषिक तनमनधनाने उपस्थित राहून मराठीच्या अस्मितेसाठी लढत असल्याचे मत रेणू किल्लेकर यांनी व्यक्त केले.Mes women

माजी महापौर सरिता पाटील बोलताना म्हणाल्या, सीमाभागात लढविली जाणारी निवडणूक हि सत्तेसाठी नसून मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठीच्या अस्मितेसाठीची लढाई आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांनी कुक्कर, मिक्सर आणि साड्यांच्या आमिषाला बळी न पडता स्वाभिमानासाठी, अस्तित्वासाठी महादेव पाटील यांना मतदान करावे. आपल्या मतदानाचा टक्का आपली सीमाभागातील ताकद दाखवून देईल, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत समितीला मतदान करा, असे आवाहन सरिता पाटील यांनी केले.

माजी नगरसेविका सुधा भातकांडे बोलताना म्हणाल्या, सीमाभागातील मराठी भाषिकांवर दुर्दैवी परिस्थिती आली आहे. या परिस्थितीला सुधारून पुन्हा सीमाभागात आपले मराठीपण सिद्ध करण्यासाठी कंबर कसून प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्रीय पक्षांप्रमाणे समिती कार्यकर्त्यांना खरेदी करून गर्दी जमवत नाही. त्यामुळे स्वाभिमान गहाण ठेवून राष्ट्रीय पक्षात गेलेल्या मराठी भाषिकांनी पुन्हा समितीच्या प्रवाहात यावे, आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित ठेवावे, सीमाभागात मराठीपण जपण्यासाठी समितीच्याच उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीकडे महिला मतदारांचा कल कमी आहे असा आरोप झाला होता मात्र शुक्रवारी झालेल्या मराठी शक्ती पदांची नावे शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.