बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांना समाजातील विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे .
ज्येष्ठ सीमा सत्याग्रही कॉ. कृष्णा मेणसे यांनी महादेव पाटील यांना आशीर्वाद दिला. याचप्रमाणे व्याख्याते, माजी प्राचार्य आनंद मेणसे यांचीही महादेव पाटील यांनी भेट घेतली.
याचप्रमाणे सुप्रीम कोर्टातील सीमाप्रश्नाच्या खटल्याचे कामकाज पाहिलेले वकील माधव चव्हाण यांनीही महादेव पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
महादेव पाटील यांचा विविध भागातून प्रचार सुरु असून प्रत्येक भागातून मराठी भाषिकांसह इतर समाजातील मतदारांचाही त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाली घागर..
बेळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार महादेव पाटील यांना मिळाले घागर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. सोमवारी दुपारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी समितीचे डमी उमेदवार सागर पाटील यांनी अर्ज माघार घेतला. तर महादेव पाटील यांना महाराष्ट्र के कारण समितीचे पारंपरिक निवडणूक चिन्ह घागर मिळाले.
2013 साली माजी कै.आमदार संभाजी पाटील यांना देखील घागर हेच चिन्ह मिळाले होते त्यावर त्यांनी बेळगाव दक्षिण मतदार संघात विजयश्री मिळवली होती याशिवाय बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार आर् एम चौगुले यांचेही निवडणूक चिन्ह घागर हेच होते.