Saturday, July 27, 2024

/

हुबळी खून प्रकरणाचा बेळगावात निषेध आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हुबळी येथील बी. व्ही. बी. कॉलेजच्या विद्यार्थिनीच्या झालेल्या खुनाचा बेळगाव जिजाऊ ब्रिगेडने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र शब्दात जाहीर निषेध केला आहे.

हुबळीच्या बी. व्ही. बी. कॉलेजची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ तिच्या झालेल्या खुनाचा राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान अर्थात बेळगाव जिजाऊ ब्रिगेडने तीव्र निषेध करत आहे. सध्या सामाजिक, समाजविघातक कृत्यांचे पेव फुटले आहे. माणसांचे सरळ साधं, सामान्य निरामय जगणं मुश्कील झाले आहे. कुणी कसं जगाव? कुणाच्या जगण्याची रीत कशी असावी? यावर धार्मिक विघातक शक्तींचा प्रभाव पडू लागला आहे. राक्षसीवृत्तीने पछाडलेले लोक दुसऱ्या धर्मातील मुलींची, स्त्रियांची छेड काढणे. त्यांना वाईट प्रवृत्तीकडे नेणे, धर्मावर परिवर्तन करून त्यांचे विवाह करणे आणि त्यानंतर त्यांचे जगणे नसून टाकणे, अशा पद्धतीचे कार्य करू लागले आहेत. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज असून नेहा खून प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. याशिवाय हे खून प्रकरण म्हणजे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे याचे द्योतक आहे. बेळगाव जिजाऊ ब्रिगेड नेहा हिरेमठ खून प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे, असा तपशील बेळगाव जिजाऊ ब्रिगेडच्या संस्थापिका प्रमुख डाॅ. सोनाली सरनोबत व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

त्या’ युवतीच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्तानचे आंदोलन

हुबळीमध्ये एका माथेफिरू युवकाने एकतर्फी प्रेमातून कॉलेज विद्यार्थिनीचा निर्घृण खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी आंदोलन छेडून मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

हुबळी येथील बीव्हीबी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून त्याच कॉलेजमधील 25 वर्षीय नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचा कॉलेज आवारातच चाकूने भोसकून खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनात श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जोरदार निदर्शने करून खुनाच्या घटनेचा निषेध करण्यात आला. राणी चन्नम्मा चौकात निदर्शने केल्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. फाशी द्या फाशी द्या त्या हरामखोराला फाशी द्या, बोलो भारत माता की जय, जय श्रीराम जय जय श्रीराम, हिंदू धर्म की जय अशा घोषणा देत निघालेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.Ramakant k

राणी चन्नम्मा चौकात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, हुबळी येथे जी खुनाची घटना घडली त्यामध्ये त्या बिचार्‍या मुलीची काहींही चूक नव्हती. मात्र फैयाज नामक एका धर्मांध मुस्लिम युवकाने एकतर्फी प्रेमातून आपल्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नेहा हिरेमठ हिची कॉलेज आवारातच चाकूने वार करून हत्या केली. खरे तर पोलीस खात्याचे कर्तव्य होते की त्यांनी तात्काळ त्या नराधमाचे एन्काऊंटर करायला हवे होते. हल्लेखोर सापडताक्षणी त्याला त्याच ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. मात्र तसे न करता त्याला अटक करण्यात आली असली तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कठोर शासन झाल्याशिवाय अशा खराब मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण होणार नाही.

तेंव्हा माझी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की, अमानुष खुनाचे कृत्य करणाऱ्या त्या फैयाज नामक युवकावर कायदेशीर कारवाई न करता त्याने ज्या ठिकाणी माझ्या एका निष्पाप भगिनींवर हल्ला करून तिला संपविलं, त्याच ठिकाणी त्याला गोळ्या घालून त्याचे एन्काऊंटर करण्यात यावे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण कोणत्याही जाती-धर्माच्या स्त्रीला देवी समान मानतो. त्यामुळे नेहा हिरेमठ हिच्या स्वरूपात एका देवीचा खून झाला आहे असे सांगून याचा मी श्रीराम सेना हिंदुस्तान आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच नेहा हिरेमठ या माझ्या भगिनीला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, असे कोंडुसकर म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.