बेळगाव लाईव्ह :हवामान खात्याने वर्तवलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या अंदाजानुसार काल शुक्रवारपासून शहर आणि तालुक्यातील वातावरण ढगाळ राहिल्यामुळे सर्वत्र काहीसे थंड समशीतोष्ण वातावरण जाणवत असल्याने रखरखते ऊन व उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना थोडा दिलासा मिळला आहे.
हवामान खात्याने बेळगाव जिल्ह्यात उद्यापर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार काल शुक्रवारपासून शहर परिसरातील वातावरण ढगाळ झाले आहे. सूर्यनारायणाने आज शनिवारी सकाळी थोडेफार दर्शन दिले.
त्यानंतर दुपारपर्यंत ऊन सावलीचा खेळ सुरू राहिला. दुपारनंतर सायंकाळी मात्र शहरातील वातावरण पावसाळा सदृश्य पूर्णपणे ढगाळ राहिले होते. ढगाळ वातावरण निर्माण होण्याबरोबरच शहर आणि परिसरातील ठीक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
एकंदर सध्याच्या गरम -थंड अशा संमिश्र समशीतोष्ण वातावरणामुळे रखरखत्या उन्हाने आणि उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काल बेळगाव शहर व तालुक्याच्या पूर्व भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर बिजगर्णी परिसरात मुसळधार पाऊस पडला.
श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त बिजगर्,णी कावळेवाडी परिसरात प्रत्येकाने घरासमोर मंडप घातले होते. तथापि सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे अनेक मंडपांची दुर्दशा झाली.