Sunday, December 22, 2024

/

उमेदवारांवर मंदिरातील पूजेसाठी देखील कांही निर्बंध!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :निवडणुकीत यश मिळावे यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना मंदिरात जाऊन जी पूजा केली जाते त्यावर यंदा कांही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार मंदिरात पूजेसाठी जाताना संबंधित उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेले ध्वज, शाल आणि संबंधित अन्य साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरांच्या व्यवस्थापन मंडळाने येथील पुजाऱ्यांना याबाबतची लेखी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन मंडळ व पुजाऱ्यांवर मोठी जबाबदारी आली आहे.

काल सोमवारी ज्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले ते कोणत्या मंदिरात जातात? तिथे पूजा करताना पक्षाचे चिन्ह असलेला ध्वज किंवा शाल वापरतात का? यावर निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलीस लक्ष ठेवून होते.Map belgaum lokssbha

बेळगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना विशेष करून राणी कित्तूर चन्नमा सर्कल येथील श्री गणेश मंदिर, हिंडलगा रोडवरील श्री विनायक मंदिर अशा कांही प्रमुख मंदिरांमध्ये उमेदवार व कार्यकर्त्यांकडून पूजा केली जाते. तसेच राष्ट्रीय पुरुषांच्या शहरातील पुतळ्यांना अभिवादन केले जाते.

यापूर्वी मंदिरातील पूजेवर निर्बंध नव्हते. मात्र यावेळी वरील प्रमाणे कांही निर्बंध घालण्यात आले आहेत. निर्बंध असले तरीही उमेदवारी अर्ज भरताना तेथे पक्षाच्या चिन्हाचा प्रचार होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन विशेष नजर ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.