बेळगाव लाईव्ह : २०२१ झाली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत निवडणूक खर्चासाठी दिलेल्या पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी तब्बल तीन वर्षांच्या विभागीय चौकशीनंतर अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दोषारोपपत्र जारी केले आहे. तत्कालीन तहसीलदार शैलेश परमानंद आणि दोन शिरस्तेदारांसह एकूण 6 जणांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
2021 मध्ये झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत तत्कालीन तहसीलदार व शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांनी केवळ पैशांचा गैरवापरच केला नाही कर्तव्यात कसूरही केली. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी 20-09-2022 रोजी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता.
याशिवाय ज्या तहसीलदारांनी निवडणूक खर्चाची कागदपत्रे आणि उर्वरित पैसे खर्च म्हणून घेतले आहेत, त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत हि बाब विशेष नोंद घेण्यासारखी आहे.
यासंदर्भात सलग तीन वर्षे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही आरोपींवर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रादेशिक आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दिरंगाई धोरणावर प्रश्नचिन्ह करत मुख्याधिकाऱ्यांना पत्र सादर केले. 15-04-2024 रोजी शासनाचे
सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांना कागदपत्रांसह सदर प्रकरण कळविले असून कारवाई न झाल्यास न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल असे या पत्रात नमूद करण्यात आले होते. या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यासाठी शासनाच्या दिनांक 15-04-2024 रोजीच्या निर्देशानुसार, जिल्हाधिका-यांनी 23-04-2024 रोजी अहवाल सादर केला आहे.