बेळगाव लाईव्ह :बेळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज केलेल्या सर्वच्या सर्व 21 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज माघारी साठी 22 एप्रिल पर्यंत मुदत असून त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे जगदीश शेट्टर, काँग्रेसकडून मृणाल हेब्बाळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून महादेव पाटील, सागर पाटील, कर्नाटक राष्ट्र समितीकडून बसप्पा कुंभार, उत्तम प्रजाकीय पार्टीकडून मल्लाप्पा चौगुले, बहुजन समाज पार्टी कडून अशोक अप्पुगोळ,
सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया कम्युनिस्ट कडून लक्ष्मण जडगन्नवर, अखिल भारत हिंदू महासभेकडून विजय मेत्रानी तर रवी पडसलगी, इस्माईल मगदूम, पुंडलिक इटनाळ, हणमंत नागनूर, अशोक हंजी, ईश्वर चिकनरगुंड, दोडप्पा दोडमणी, नितीन म्हाडगुड, अश्फाक अहमद उस्ताद, भारती निरळकेरी, महांतेश निर्वाणी, महांतेश गौडर यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत असून त्यानंतरच सोमवारी चिन्हांचे वाटप होणार आहे आणि निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.