Tuesday, December 24, 2024

/

16 रोजी बेळगाव श्री -2024, बेळगाव हर्कुलस शरीर सौष्ठव स्पर्धा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मराठा युवक संघ बेळगाव या संघटनेतर्फे केएबीबी आणि बीडीबीबीए यांच्या सहकार्याने येत्या मंगळवार दि. 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी चार वाजता 58 वी ‘बेळगाव श्री -2024’ या जिल्हा पातळीवरील भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा, तसेच ‘मि. बेळगाव हर्कुलस -2024’ ही कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कर्नाटक राज्य क्रीडा प्राधिकरणाच्या मान्यतेने सदर शरीर सौष्ठव स्पर्धा रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर येथे होणार आहेत. बेळगाव श्री किताबाची स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 80 किलोवरील गट अशा सात वजनी गटात घेतली जाईल. त्याचप्रमाणे मि. बेळगाव हर्कुलस स्पर्धा 60 किलो, 70 किलो, 80 किलो आणि 80 किलोवरील गट अशा चार वजनी गटात घेतली जाईल.

या दोन्ही गटातील टायटल विजेत्या शरीर सौष्ठवपटूंना आकर्षक करंडकासह रोख 21,000 रुपये बक्षिसादाखल दिले जाणार आहेत. मि. बेळगाव हर्कुलस स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या उपविजेत्यांना अनुक्रमे 15,000 व 11,000 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. याव्यतिरिक्त प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

बेळगाव श्री -2024 शरीर सौष्ठव स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आदित्य इंजीनियरिंग कन्सल्टंटस बेळगावचे व्यवस्थापकीय भागीदार सचिन ऊसुलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सिद्धार्थ हुंदरे, महेश फगरे, संजय सुंठकर, धनंजय पटेल, दिगंबर पवार, संजय मोरे, शिवाजी हंडे, सदानंद शिनोळकर, महादेव चौगुले, संजय चव्हाण, नेताजी जाधव व राजाराम सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत.

तरी शरीर सौष्ठवपटुंनी मोठ्या संख्येने उपरोक्त स्पर्धांमध्ये भाग घ्यावा. त्याचप्रमाणे क्रीडाशौकिनांनी या स्पर्धांना बहुसंख्येने हजेरी लावून आनंद लुटावा, असे आवाहन मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर आणि सरचिटणीस चंद्रकांत गुंडकल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.