Tuesday, January 21, 2025

/

स्मार्ट सिटी 2:0 मध्ये बेळगावची निवड

 belgaum

बेळगाव लाईव्ह :स्मार्ट सिटी योजना जुलै महिन्यात आटोपती घेण्यात येणार असली तरी आता पुन्हा याबाबतीत आनंदाची बातमी आली आहे. बेळगावची स्मार्ट सिटी २.० साठी निवड झाली असून संपूर्ण कर्नाटकातून एकमेव शहर असणार आहे.18 शहरांच्या यादीत बेळगावचे नाव 4 व्या क्रमांकावर आहे.

दहा वर्षापूर्वी स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात बेळगावची निवड झाली होती. आता स्मार्ट सिटी 2.0  (दुसऱ्या टप्प्यात)यात देखील केंद्र सरकारच्या महत्कांक्षी योजनेतही बेळगावची निवड झाली आहे. संपूर्ण कर्नाटकातून बेळगाव या एकाच महापालिकेचीच निवड झाली असून या योजनेंमुळे  महापालिकेला 135 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

बेळगाव महा पालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार देशातील शंभर शहरांत स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली होती. त्यामधून 18 शहरांची स्मार्ट सिटी 2.0 या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये कर्नाटकातून बेळगाव आणि हुबळी-धारवाड महापालिकेकडून केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवले होते. पैकी या योजनेसाठी बेळगावची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे धारवाडला  मागे टाकून संपूर्ण राज्यात बेळगाव या एकमेव महापालिकेची निवड झाली आहे.Smart city 2

देशातील स्मार्ट सिटी 2.0 या योजनेत घनकचरा निर्मूलनासाठी 135 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून महापालिकेला स्वतःचा वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प सुरू करावा लागणार आहे.

महापालिकेने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवताना सध्या महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली होती. त्यामध्ये बायोगॅस प्रकल्पातूून उत्पन्न होत असलेल्या गॅसचा वापर पथदीपांसाठी करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी योजनेच्या कामकाजाबाबत बेळगावची जनता फारशी खूश नाही,  कामा बाबत अनेक तक्रारी आहेत  तरी आता पुन्हा बेळगावची स्मार्ट सिटी 2.0 साठी निवड झाली असल्यामुळे योजनेत तरी भरीव कामगिरी व्हावी, ये रे माझ्या मागल्या होऊ नये अशी भावना लोकांतून व्यक्त होत आहे.

शहरात राबवलेल्या स्मार्ट सिटी योजनेबद्दल लोकांत अनेक तक्रारी आहेत. अर्धवट कामामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. तरीही योजानेला सरकारकडून चार पुरस्कार मिळाले आहेत. आता या योजनेचे तरी काम चांगले होणार का हे पाहावे लागणार आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.