Sunday, May 12, 2024

/

राहुल-प्रियांका लागले प्रचाराला!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्यास भावी उमेदवारांनी जोरकस तयारीला सुरुवात केली आहे. चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरी भाजपमधून खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि काँग्रेसमधून सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

या पार्श्वभूमीवर यमकनमर्डी मतदार संघात युवा नेते राहुल जारकीहोळी आणि प्रियांका जारकीहोळी यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

आज पाच्छापूर येथील बसापूर या गावात बुथनिहाय काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अधिकाधिक जागा बळकावण्यासाठी कंबर कसली असून प्रभावी नेत्यांचा चेहरा समोर ठेवून उमेदवार निश्चित करण्याची पॉलिसी काँग्रेसने आखली आहे.

 belgaum

चिकोडी मतदार संघात सतीश जारकीहोळी यांच्या माध्यमातून प्रियांका जारकीहोळी यांना पुढे करण्यात आले असून सतीश जारकीहोळी हि जागा निवडून आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.Rahul Priyanka

आज पाच्छापूर येथे झालेल्या बैठकीत काँग्रेस पक्षाला बूथ स्तरावर बळकट करून या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मते मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. हमी योजनांसंदर्भात विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराविरोधात जनतेत जागृती करावी, विकास आणि हमी प्रकल्पांना दृष्टिकोनात ठेवून आगामी रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा झाली.

चिकोडी मतदार संघात विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे आधीपासूनच वर्चस्व आहे. मात्र राज्यस्तरावर राजकारणात किंगमेकर म्हणून परिचित असणारे सतीश जारकीहोळी हे या निवडणुकीत आपल्या कन्येच्या माध्यमातून नशीब आजमावत असून बेळगावसह चिकोडी मतदार संघाची निवडणूक देखील राजकारणापेक्षा प्रतिष्ठेवर अधिक गाजणार असे चित्र दिसत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.