Friday, November 29, 2024

/

नव्या आणि जुन्या पिढीला जोडणारा कार्यकर्ता…रणजित चव्हाण

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर देवस्थान समिती अध्यक्ष आणि सार्वजनिक गणेश महामंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमातून समाजासाठी कार्य केलेल्या 71 वर्षीय रणजीत चव्हाण पाटील यांची शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शहर महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटी देण्यात मोलाचं योगदान देणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून रणजित चव्हाण पाटील यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणजेच शहर समिती कार्याध्यक्षपदी झालेली निवड होय.

सडेतोड विचार मांडणारे, सीमा प्रश्नाची जाण असणारे, समाजाच्या प्रत्येक स्तरात संबंध असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच रणजीत चव्हाण पाटील. गेल्या 50 वर्षांपूर्वी बेळगाव शहराच्या पाटीलगल्ली भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता म्हणून भगव्या पताका लावणारे व्यक्तिमत्व आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष बनून नेतेपदी मिळाल्याने संघटनेला बळकटी मिळेलच याशिवाय सीमा लढा तीव्रतेने पुढे जाईल असा विश्वास व्यक्त होत आहे. चव्हाण पाटलांसारखे अभ्यासू व्यक्तीमत्व लाभल्याने सीमा भागाची व्यथा वेदना महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत जबाबदारीने पोचवण्याची क्षमता असणारा नेता मिळाल्याने सामान्य मराठी माणसांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे.

1985 साली काळ्यादिनानिमित्त बेळगाव शहरात झालेल्या मूक सायकल फेरीवर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध करीत असताना अठरा पोलिसांनी कोंडाळे करत रणजीत चव्हाण पाटलांच्या पाठीवर हल्ला करून अक्षरश: पाठीची चाळण करून सोडली होती, तरीही तशा परिस्थितीतून न डगमगता आपल्या आंदोलनात ते पुढे जात राहिले. ज्या ज्या वेळी मराठी कार्यकर्त्याची ओळख काय आहे असं विचारलं जातं त्यावेळी असे कार्यकर्ते समाजापुढे उभे राहतात त्यावेळी सीमा लढा समजून घेण्यासाठी अधिक उपयोग होतो.

पोलिसांची लाठी पाठीवर खाऊन मार सोसलेल्या रणजीत चव्हाण पाटील यांनी अनेकवेळा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केलेले आहे गेल्या सहा महिन्यात मुंबई मुक्कामी मुख्यमंत्र्यांची असो किंवा विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा फॉलोअप घेण्यात आणि तेच अग्रेसर होते.Ranjit chavan

सामान्यापासून असामान्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाला जवळचा वाटणारा कार्यकर्ता अशी रणजीत पाटलांची ओळख असल्याने या निवडी बाबत मराठी माणसाने समाधान व्यक्त केले जात आहे. १९९६ ते २००१ या काळात बेळगाव शहरातल्या मध्यवर्ती भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक पद देखील त्यांनी भूषवले होते. दसऱ्यानिमित्त ज्योती कॉलेज मैदानावर होणाऱ्या सीमोलंगण, बेळगावातील देवदेवसकीचे उत्सव त्याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून ते अधिकाराने सहभागी होतात.

आज पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव शहर परिसरातील सर्व धार्मिक उत्सव आनंदाने साजरे केले जातात त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला जुना जाणता अभ्यासू आणि धडाडीचा कार्यकर्ता मिळाल्याने समिती नवचैतन्य पसरले आहे.मागील पिढी बरोबर नव्या पिढीला जोडणारा दुवा म्हणून रंणजीत चव्हाण पाटलांचं नाव घेतलं जातं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.