Friday, May 10, 2024

/

धर्म कारणाचे राजकारण… निवडणुकीच्या तोंडावर भगव्याचे स्मरण..

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने ठराव करून भगव्याचा सन्मान राखला वेळोवेळी आंदोलने केली पण ज्या ज्या वेळी प्रसंगाला ही भगव्याची मालकी समितीची मानून दोन्हीही राष्ट्रीय पक्षाने भगव्याचा अपमान करण्याची संधी सोडली नाही अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

केवळ निवडणुकीच्या तोंडावर मात्र दोन्ही राष्ट्रीय पक्षांना भगव्याचा पुळका येतो एरवी मात्र समितीकडेच भगव्याचा सन्मान राखण्याची जबाबदारी असते त्यामुळे राष्ट्रीय पक्षांचा भगव्या वरचे प्रेम हे केवळ पूतना मावशीचे प्रेम आहे असा आरोप केला जात आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी आज रविवारी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज विश्वगुरू संत श्री बसवेश्वर यांना अभिवादन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यासाठी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात भगवे ध्वज असलेली ही रॅली पाहून काँग्रेसला निवडणूक येताच भगव्याची आठवण झाली का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून या मतलबी वृत्तीबद्दल नाराजी व्यक्त होण्याबरोबरच विशेष करून मराठी भाषिक सखेद आश्चर्यासह काँग्रेसची कीव करताना दिसत होते.

 belgaum

एकीकडे भाजपचा बेळगाव लोकसभा मतदारसंघातला उमेदवार जाहीर व्हायचा बाकी असताना काँग्रेसने मात्र प्रचार फेरी काढून सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय राजकारणात राम मंदिरावरून राजकारण तापले असताना कर्नाटकच्या महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबबाळकर यांनीही मी देखील राम भक्त आहे असं वक्तव्य कर करून पुन्हा एकदा भगवा आणि राम या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलाय.

धर्मकारण्याने भगवे करण्याचे राजकारण करताना सीमा भागात राष्ट्रीय पक्षानी केवळ निवडणुका पुरतंच हे धर्मकारण आठवणीत येतं, मात्र समितीने नेहमीच मराठी माणसाचा धर्म प्रमुख म्हणून मराठी भाषा ही जात मानून काम केलं त्यामुळे समितीच्या पाठीमागे समस्त मराठी माणूस कायमच राहिला आहे.Congress saffron flag

निवडणुकीत समितीच्या पाठीमागे ही ताकद उभी राहिली त्यामुळे समितीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झाले ही शक्ती आता अधिकाधिक तीव्र होत चाललेले असल्यामुळे राष्ट्रीय पक्षांना थोडासा हादरा बसत चाललेला आहे त्यामुळे ह्या भगव्याचे प्रेम दाखवून आता त्यांना अगत्याचे वाटत आहे त्याचबरोबर मराठी माणूस आपल्याकडे कसा वळवता येईल याकडे त्याने लक्ष केंद्रित केलेले आहे. पण अश्या परिस्थितीत रिंग रोड बायपास रोड मराठी फलकांची केलेली मोडतोड ह्या घटना ताज्या आहेत.

अश्या या मराठी माणसाच्या काळजावर उमटलेले जखमा मराठी माणूस विसरू शकत नाही त्यामुळे मराठी माणूस अधिक तीव्रतेने समितीच्या पाठीमागे उभा राहत आहे हीच मायबाप राष्ट्रीय पक्षाच्या दृष्टीने चिंताजनक बनली आहे.

काँग्रेसने मोठ्या संख्येने रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन काँग्रेस आणि उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा जयजयकार करत निघालेले कार्यकर्ते साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. दरम्यान रॅलीमध्ये काँग्रेसचे पक्ष चिन्ह असलेल्या ध्वजांच्या तुलनेत भगवे ध्वजच जास्त दिसत होते. इतर वेळी भगव्या ध्वजावर वक्रदृष्टी ठेवणारा काँग्रेस पक्ष या पद्धतीने निवडणूक येताच ती जिंकण्यासाठी भगव्याचा आधार घेत असल्याचे पाहून शहरवासीय सखेद आश्चर्यासह काँग्रेसची कीव करताना दिसत होते. विशेष करून मराठी भाषिकांमध्ये याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होताना दिसत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.