Saturday, April 27, 2024

/

मराठा सेंटर येथे 15 एप्रिलला डीएससी भरती मेळावा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :डीएससीमध्ये नांव नोंदणीसाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे फक्त मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित सैन्याचे माजी सैनिक/ टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लर्क (एसडी) पदाकरिता येत्या दी. 15 ते 16 एप्रिल 2024 रोजी डीएससी भरती मेळावा (रॅली) आयोजित करण्यात आला आहे.

सदर भरती मेळाव्यासाठी नावनोंदणीची तारीख सोल्जर जीडी पदासाठी सैन्याच्या मागील सेवानिवृत्तीच्या तारखेपासून दोन वर्षा आतील असावी. त्याचप्रमाणे सोल्जर क्लार्क पदासाठी पाच वर्षा आतील असली पाहिजे.

नांव नोंदणीच्या तारखेला सोल्जर जीडीसाठी वय 46 वर्षांपेक्षा कमी आणि सोल्जर क्लार्कसाठी (एसडी) 48 वर्षांपेक्षा कमी असावे.

 belgaum

सोल्जर जनरल ड्युटी / क्लार्क (एसडी) म्हणून डीएससीमध्ये नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे आपली हजेरी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.