बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्त असलेल्या बेळगाव पोलीस आयुक्तपदी लाडा मार्टिन यांची नियुक्ती झाली आहे.
2009 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी लाडा मार्टिन मारबनियांग हे बेळगावची धुरा सांभाळणार आहेत. पोलीस भरती विभागाचे डीआयजी असलेले मार्टिन बेळगाव पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावणार आहेत.
गेल्या महिन्यात डॉक्टर सिद्रामप्पा हे सेवानिवृत्त झाल्यानंतर बेळगाव पोलीस आयुक्त पद रिक्त होते त्या पदावर लाडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळचे मेघालयचे असणारे मार्टिन यांनी 2009 साली आयपीएस अधिकारी बनल्यानंतर गुलबर्गा, यादगिर जिल्ह्याचे एसपी आणि सीआयडी बेंगलोर येथे सेवा बजावली आहे.
44 वर्षीय या तरुण आयपीएस अधिकाऱ्याने आर्ट्स मध्ये मास्टर डिग्री केली आहे