Tuesday, November 19, 2024

/

खानापूर समिती शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट

 belgaum

बेळगाव  लाईव्ह : मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामूळे समितीने निवडणूक लढवून आपले अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नसून लढाल तरच टीकाल नाही तर संपून जाल असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांने केले असून महाराष्ट्र समितीच्या आणि मराठी भाषिकांच्या कायम आहे अशी ग्वाही दिली आहे.

खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री पवार यांची भेट घेतली.

तसेच सीमा भागातील सद्यस्थितीची माहिती देत गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात कन्नडची सक्ती मोठ्या प्रमाणात वाढवली जात आहे. त्यामुळे मराठी भाषिकांना विविध प्रकारच्या दडपशाहीचा सामना करावा लागत असून पुन्हा एकदा कन्नड सक्ती विरोधात लढण्याची गरज निर्माण झाली आहे.

तसेच समितीची ताकत वाढविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे सीमा भागातील मराठी जनतेला पाठींबा आणि मार्गदर्शन करावे अशी मागणी केली.

Sharad pawar
यावेळी पवार यांनी सीमा भागातील परिस्थितीची जाणीव आहे तसेच समितीच्या नेत्यांकडून विविध प्रकारची माहिती दिली जाते.

सीमा लढ्याचा एक भाग म्हणून आणि मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी समितीने निवडणुका लढवण्याची भूमिका घ्यावी यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी माहिती दिली. माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील समितीने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला त्याला सहकार्य करून उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जाते असे सांगितले.यावेळी खानापूर तालुका समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले, मुकुंद पाटील, गुरूराज सरदेसाई आदी उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.