बेळगाव लाईव्ह:जिल्हा पंचायत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खानापूर उपविभागीय कार्यालयातील एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला लाच स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज मंगळवारी रंगेहात पकडले आहे.
त्यामुळे खानापूर उपविभागीय कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्याचे नांव डी. एम. बन्नूर असे आहे.
लोकायुक जिल्हा उप अधीक्षक भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक उस्मान आवटी व इतर लोकायुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली.