बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक हे नेहमीच कर्नाटकाच्या ‘हिटलिस्टवर’ राहिले आहेत. मात्र आता फेसबुक हॅकर्सच्या यादीतही समिती नेत्यांनी स्थान पटकावले असून कित्येक समिती नेत्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे!
सध्या देशभरात फेसबुक अकाउंट मोठ्या प्रमाणात हॅक करण्यात येत असून सीमाभागात देखील कित्येकांचे फेसबुक अकाउंट हॅक करत सायबर चोरट्यांनी हात साफ केला आहे.
फेसबुक युजर्सच्या अकाउंटवर अश्लील छायाचित्र दिसून येत असून वैयक्तिक माहिती देखील चोरीला गेली असल्याची भीती व्यक्त होत आहे. कोणतेही अप डाउनलोड करण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.
आपले फेसबुक अकाउंट हॅक झाले असल्याचे निदर्शनात येताच सेटिंगमध्ये जाऊन फेसबुकला रिपोर्ट करणे आवश्यक आहे. अनोळखी ऍप डाउनलोड करू नये, कोणतेही ऍप डाउनलोड करण्यापूर्वी ऍपचा लोगो आणि स्पेलिंग पडताळून पाहणे गरजेचे आहे.
माहिती नसलेले ऍप डाउनलोड करू नये, अवघड पण लक्षात ठेवायला सोपा असणारा पासवर्ड सेट करावा, कोणत्याही परिस्थितीत पासवर्ड शेअर करू नये यासारख्या गोष्टींची खबरदारी घेण्याची सूचना सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.
धामणे येथील यल्लाप्पा रेमानीचे यांचे अकाउंट हॅक झाले आहे त्यांनी पोलीस स्थानकात अर्ज देखील दिला आहे मात्र अद्याप त्यांचे अकाऊंट बहाल करण्यात आले नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाढू लागली आहे.