Wednesday, January 15, 2025

/

स्लम बोर्डाच्या घरांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरातील श्रीनगर झोपडपट्टी येथे महापालिकेच्या स्लम बोर्डाकडून निवासी संकुलाच्या स्वरूपात बांधण्यात आलेली घरे अपात्र लाभार्थींना देण्याचा प्रकार तात्काळ थांबवंन संबंधित घरे गरजू पात्र लाभार्थींनाच दिली जावीत, अशी मागणी कर्नाटक कोळगेरी अभिवृद्धी मंडळ या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कर्नाटक कोळगेरी अभिवृद्धी मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील श्रीनगर येथील झोपडपट्टीच्या ठिकाणी महापालिकेच्या स्लम बोर्डाकडून निवासी संकुलाच्या स्वरूपात घरे बांधण्यात आली आहेत. ही घरे ज्या गरीब लाभार्थींना मंजूर झाली आहेत त्यांना देण्याऐवजी महापालिकेकडून अनाधिकृतपणे अपात्र लाभार्थींच्या नावाने घराची कागदपत्रे केली जात आहेत. त्यांच्या नावाने घरांची हक्कपत्रे केली जात आहेत.Slum board

घरे नामंजूर झालेल्यांना अधिकाराचा गैरवापर करून घरे मंजूर केली जात आहेत. यासाठी घरांचे वाटप दोन दोनदा केले जात आहे. या पद्धतीने रीतसर नियमानुसार ज्यांना घरे मंजूर झाली आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे. आम्ही स्लम बोर्डाकडून घरे बांधून मिळावी यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका वगैरे सर्वांकडे रीतसर सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असताना अद्यापपर्यंत आम्हाला घरे मंजूर झालेली नाहीत.

ही घरे आम्हाला तात्काळ मिळावीत तसेच घर वाटपामध्ये जो गैरप्रकार सुरू आहे तो तात्काळ थांबविण्यात यावा. घरे मंजूर झालेल्या गरजू पात्र लाभार्थींच्या नावेच घरांची हक्कपत्रे केली जावीत. अपात्र लाभार्थींना घरे देऊ नयेत, अशी आमची जिल्हाधिकारी आणि सरकारकडे मागणी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.