बेळगाव लाईव्ह :जागतिक जल दिन येत्या 22 मार्च 2024 रोजी असून यादिवशी नागरिकांना आणि स्वयंसेवकांना मलाप्रभा नदीच्या स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या एकत्रित प्रयत्नात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांचा पुढाकार, खानापूर -बेळगाव प्रदेशातील मलप्रभा नदी आणि मंगेत्री व हलत्री या तिच्या उपनद्यां शेजारील विविध गावं -शहरातील स्वयंसेवकांसह परिसरक्कागी नावु बेळगाव युनिटतर्फे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश मलाप्रभा नदी आणि तिच्या सभोवतालचा परिसर पुनर्संचयित करणे हा आहे. या उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट नदीला विघटन न करता येणारा हानिकारक व विषारी घनकचरा आणि कचऱ्यापासून नदीची मुक्तता करणे, स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरणाचा मार्ग मोकळा करणे हा आहे.
मलाप्रभा नदी कणकुंबी येथील तिच्या उगमस्थानापासून तिच्या मूळ अविरल निर्मला निरंतर सुंदर स्थितीत येईपर्यंत बागलकोट जिल्ह्यातील कुडाळा संगमा येथील संगमापर्यंत अथक परिश्रम करणे हे या उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे. एम. के. हुबळी, कुडल संगमा आदी ठिकाणी परिसरक्कागी नावूच्या सदस्यांद्वारे अशाच प्रकारचे उपक्रम आखले जात आहेत.
सदर उपक्रमामुळे महत्त्वपूर्ण फरक पडणार असल्यामुळे प्रत्येकाने या प्रयत्नांमध्ये सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमाचा तपशील : तारीख -22 मार्च 2024, वेळ -सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत. नदी स्वच्छतेची ठिकाणे: 1) कणकुंबी मंदिर, 2) हबनत्ती मंदिर, 3) कुसमल्ली ते जांबोटी नदी पूल, 4) जांबोटी ते खानापूर ओलमणी नवीन पूल, 5) व्हिटीयूच्या मागे संतीबस्तवाड मंगेत्री पूल, 6) असोगा मंदिर, 7) खानापूर सीव्हीपीआय पूल, 8) खानापूर मलप्रभा घाट.
सहभागींसाठी महत्त्वाच्या सूचना : 1) कृपया प्रत्येकाने स्वतःचे पिण्याचे पाणी, अल्पोपहार/अन्न आणि टोप्या आणाव्यात. 2) आरामदायक जलरोधक पादत्राणे घाला (शक्य असल्यास). 3) नदीचे किनारे, उघडे कोरडे पाणी आणि जलाशयं स्वच्छ केले जातील; तुमच्या सुरक्षिततेसाठी खोल पाण्यात प्रवेश करणे टाळा.
4) मौल्यवान वस्तू सोबत आणणे किंवा महागडे सामान घालणे टाळा; निष्काळजी वर्तनामुळे कोणतेही नुकसान/चोरी/जखमी होणे यासाठी आयोजक जबाबदार नाहीत. उपरोक्त उपक्रमात सहभागी होऊ इच्छुकांनी
अधिक माहितीसाठी संपर्क : सदस्य परिसरक्कागी नावू, बेळगाव युनिट -दिलीप कामत (9448157588) अथवा नेला कोईल्हो (9343413193).