बेळगाव लाईव्ह:गतवर्षीच्या तुलनेत राकसकोप व हिडकल जलाशयांमध्ये यावर्षी अधिक पाणीसाठा असला तरी देखील शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी एल अँड टी कंपनीकडून 15 टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जात आहे.
राकसकोप जलाशयामध्ये काल सोमवारी 2466.60 फूट इतका पाणीसाठा होता जो गतवर्षीच्या तुलनेत 2.4 फुटाने जास्त आहे. मागील वर्षी याच दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी राकसकोपची पाणी पातळी 2464.20 फूट इतकी होती.
हिडकल जलाशयामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 26 फेब्रुवारी रोजी 5.045 टीएमसी इतका अधिक म्हणजे 29.582 टीएमसी पाणीसाठा होता. पाणी अधिक असले तरी येत्या एप्रिल -मे महिन्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या शहराला चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पुढील काही दिवसात पाणीपुरवठा करणाऱ्या दिवसात वाढ करण्याची नियोजन एल अँड टी करत आहे. दरम्यान, बेळगाव शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन सध्या 15 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
महापालिकेशी चर्चा करून पाणी सोडण्याच्या दिवसात वाढ केली जाणार असली तरी शहरवासी आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन टी कंपनी बेळगावचे कार्यकारी अधिकारी हार्दिक देसाई यांनी केले आहे.