Saturday, July 27, 2024

/

‘प्यास’ने केले मच्छे तलावाचे यशस्वी पुनरुज्जीवन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:प्यास फाउंडेशनने अधिकृतपणे पुनरुज्जीवन केलेला मच्छे येथील तलाव लघु पाटबंधारे विभाग आणि गावातील रहिवाशांकडे सुपूर्द केल्याने मच्छे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प पूर्ण होणे हा प्याससाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. परिसरातील भूजल कमी झाल्यामुळे गावकऱ्यांच्या विनंतीवरून एकेपी फेरोकास्ट्सच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) योगदानाद्वारे 2021 मध्ये मच्छे तलावाचे जीर्णोद्धार कार्य सुरु झाले होते.

समुदायाच्या आवाहनाला तत्परतेने प्रतिसाद देत बेळगावच्या प्यास फाउंडेशनने उद्योजक राम भंडारे, पराग भंडारे आणि एकेपी फेरोकास्ट्सचे गौतम भंडारे यांच्या बहुमोल पाठिंबामुळे हा प्रकल्प हाती घेतला. सदर 4 एकरांपेक्षा जास्त जागेत विस्तारलेल्या या तलावातून खोल 20 फुटांपर्यंत मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला.

साचलेला गाळ काढून तलावाच्या काठाला मजबुती दिली गेली. सीएसआर निधीमध्ये अंदाजे 17 लाखांची तरतूद असलेल्या या प्रयत्नाला लघु पाटबंधारे विभागाचे सहकार्य लाभले. जे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास पुरक ठरले.Machhe lake

सदर कायाकल्प प्रकल्पाचा सकारात्मक परिणाम गावात आधीच जाणवला आहे. जो जवळच्या विहिरींच्या सततच्या पाण्याच्या प्रवाहात दिसून येत आहे. अपेक्षा फोल ठरवणाऱ्या अलीकडच्या मर्यादित पावसाच्या परिस्थितीत पुनरुज्जीवित तलावाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे स्थानिक शेतकऱ्यांना या हंगामात भाजीपाला लागवड करण्यास सक्षम केले आहे. जे पूर्वी पाणी टंचाईमुळे अडथळ्याचे ठरले होते. मच्छे तलावाच्या प्रांगणात गेल्या 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या एका समारंभात तो तलाव अधिकृतपणे लघु पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द करण्यात आला.

एकेपी फेरोकास्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राम भंडारे यांनी प्रतिकात्मकरित्या लघु पाटबंधारे विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एस. माळगी यांच्याकडे तलावाची जबाबदारी सोपवली. यावेळी बोलताना डॉ. माधव प्रभू यांनी एकेपी फेरोकास्ट्सच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल आणि ग्रामस्थांनी प्यास फाऊंडेशनला हे काम सोपवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.