बेळगाव लाईव्ह:महापालिकेच्या अंतर्गत नागरी दारिद्र्य निर्मूलन उपक्रम 24.10 टक्के, 7.25 टक्के आणि 5 टक्के तर एसएफसी अंतर्गत 24.10 टक्के योजनेअंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांतर्गत लाभ मिळवण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.
या योजनांतर्गत लघुउद्योजकांसाठी अनुदान, शस्त्रक्रियेसाठी अनुदान, एमबीबीएस, बीई शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि इतर अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन धन, शिलाई मशीन, तीन चाकी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे.
योजनांसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत. अर्ज मिळाल्यानंतर त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. उपलब्ध अनुदानाच्या पात्रतेनुसार आणि प्राधान्यक्रमानुसार आवश्यक असल्यास प्रत्यक्ष पाहणी करून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
त्यातंर धनादेश किंवा कर्ज देणार्या बँकांत मदत जमा करण्यात येणार आहे. या योजनांबाबत अधिक माहितीसाठी नागरी दारिद्र्य निर्मूलन कक्षाच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.