Sunday, April 21, 2024

/

कल्लेहोळचा तो युवक खानापूरात करत होता घरफोडी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : 2021 पासून खानापूर तालुक्यातील विविध भागात घरफोड्या करणाऱ्या युवकाला बेळगाव जिल्हा पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्या जवळून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात बेळगाव पोलिसांना यश मिळाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गुळेद यांनी दिली आहे.एसपी गुळेद यांनी आज बेळगाव येथील एसपी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये बैलहोंगल, चिक्कोडी आणि खानापूर येथील चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना शोधण्यात यश आले आहे.

खानापूर घरफोडी प्रकरणी समजलेली अधिक माहिती अशी की खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते.Khanapur theft

या पथकाने कसून तपास करून परशुराम नाना गौंडाडकर वय 35 रा. कल्लेहोळ बेळगाव याच्याकडून एकूण 673.4 ग्रॅम सोन्याचे दागिने व एकूण 627 ग्रॅम. चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खानापूरचे सीपीआय मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पीएसआय चन्नबसव बबली. एएसआय एन. के. पाटील, हवालदार बी. जी. यलीगार, जगदीश काद्रोळी, जयराम हम्मनावर, पोलीस शिपाई मंजुनाथ मुसळी, प्रवीण होंडद, पुंडलिक मादार आणि बेळगाव तांत्रिक विभागातील विनोद ठकन्नावर या सर्वांनी दिवसरात्र कसून तपास करून गुन्हेगारांचा माग काढण्यात यश मिळवले, असे ते म्हणाले. एसपी भीमाशंकर गुळेद यांनी तपास पथकाचे कौतुक करून त्यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.