Saturday, December 28, 2024

/

हाफ मॅरेथॉन मध्ये दोन हजार धावपटूंनी सहभाग

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांनी रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी बेळगाव हाफ मॅरेथॉनची १३ वी आवृत्ती रविवारी 11 फेब्रुवारी २०२४ रोजी ‘से नो टू ड्रग्स’ या थीमसह यशस्वीपणे पार पडली. सर्व वयोगटातील शर्यतीत संपूर्ण भारतातून 2000 हून अधिक धावपटू सहभागी झाले होते.

रोटरी अर्ध मॅरेथॉनमध्ये श्रीकांत बी., नविता दिकोंडा अजिंक्य!

रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणूग्रामच्या सहकार्याने ‘से नो टू ड्रग्स’ या शीर्षकाखाली आयोजित 13 व्या रोटरी बेळगाव अर्ध मॅरेथॉन शर्यतीतील पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद अनुक्रमे श्रीकांत बी. व नविता दिकोंडा यांनी पटकावले. तसेच अन्य गटांमध्ये नीरा पुरोहित, अंकित खाडे, डॉ. नेत्रा मनोज सुतार, मनीष दळवी व क्रांती विटाळ हे विजेते ठरले.

रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावतर्फे आयोजित 13 वी रोटरी बेळगाव अर्ध मॅरेथॉन काल रविवारी सकाळी सुमारे 2000 धावपटूंच्या अभूतपूर्व प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. प्रमुख पाहुणे विजया पीयू कॉलेजचे डॉ. रवी पाटील आणि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जोयदीप मुखर्जी यांच्या हस्ते ध्वज दाखवून शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला. शर्यतीच्या बक्षीस समारंभाप्रसंगी डॉ. भीमसेन तिक्कलकी यांचे अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीपर व्याख्यान झाले. शर्यतीत सहभागी सर्व धावपटूंना पदक आणि टी-शर्ट त्याचप्रमाणे विजेत्यांना रोख बक्षीसासह पदक, टी-शर्ट व ई -टाइमिंग सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.Merethon

मॅरेथॉन शर्यत यशस्वी करण्यासाठी संयोजक समितीमधील रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावचे अध्यक्ष संजीव देशपांडे, संयोजक प्रमुख लतेश पोरवाल, लोकेश होंगल, सोमनाथ कुडचीकर, शर्यत संचालक जगदीश शिंदे, रोट्रॅक्ट अध्यक्ष रोहन कदम, सेक्रेटरी हर्षद दोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले. शर्यतीच्या यशस्वी आयोजनासाठी बीएस्सी टेक्स्टाईल मॉल, के -बीइसी, उज्जीवन बँक एक्वा लिंक हायड्रेशनचे गुडनेस हेल्थ हब अँड हायड्रेशन सपोर्ट यांचे सहकार्य लाभले. शर्यतीचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते) खालील प्रमाणे आहे.

अर्ध मॅरेथॉन (21.095 कि.मी.) : 39 वर्षापर्यंतचा पुरुष गट -श्रीकांत बी., राजन कुसवाड, भुवन सुयाल. महिला गट -नविता दिकोंडा, पूजा रजपूत, अरुंधती पोटे. 40 ते 49 वर्षाचा पुरुष गट -विनायक जांबोटकर, संतोष शानबाग, राहुल पोरवाल. महिला गट -नीरा पुरोहित, नुपूर वाटवे, शिवानी अनगोळकर. 50 वर्षे व त्यावरील पुरुष गट -रणजीत कणबरकर, कलाप्पा तीरवीर, शिवप्रसाद ठाकूर. महिला गट -नलिनी पद्मनाभराव.

10 कि. मी. : 30 वर्षापर्यंतचा पुरुष गट -अंकित खाडे, मुबारक दंतली, अजित राठोड. महिला गट -निरवी कलकुप्पी, अनास्थाशिया करवालो, श्रुती चौगुले. 31 ते 44 वर्षे पुरुष गट -सुरेश चौगुले, बाबू चौगुला, कुणाल अल्लोळी. महिला गट -नेत्रा सुतार, सानिया ताशिलदार, कविता गाणीगेर. 45 वर्षे व त्यावरील पुरुष गट -परशराम कुनगी, दीपक खटावकर, अमन नदाफ. महिला गट -मयुरा शिवलकर, निधी चौगुले, सुषमा भट.

5 कि.मी. : 16 वर्षाखालील मुले -मनीष दळवी, अभिषेक दळवी, आर्यन पाटील. मुली -क्रांती विटाळ, सृष्टी पंचरीया, अरना असुंडी. 17 ते 34 वर्षे पुरुष गट -सुरज तिकुडी, अंकित कुमार, अंकित कुमार. महिला गट -दिव्या हेरेकर, स्नेहा भोसले, समीक्षा विटाळ. 35 ते 44 वर्षे पुरुष गट -बसवराज हुद्दार, सन्नपरसप्पा, छत्तर भाऊसाहेब आबा. महिला गट -स्वप्ना चिटणीस, मृणाल वाटवे, स्नेहा वेर्णेकर. 45 ते 54 वर्षे पुरुष गट -विनायक असुंडी, विनय पाटील, मोरबल विला. महिला गट -रूपा निरंजन, रेश्मा पोरवाल, सुजाता गोवेकर. 55 वर्षे व त्यावरील पुरुष गट -यशवंत परब, बाळाप्पा मन्नीकेरी, यशोधर कोटियन. महिला गट -राजेश्वरी बलोगी, कीर्ती टेंभे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.