Saturday, July 13, 2024

/

किल्ला तलावाजवळील अपघातात युवकाचा मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बॅरिकेड्स चुकवण्यासाठी चुकीच्या दिशेने ट्रक चालवून मोटरसायकलला ठोकरल्याने मारुती नगर येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास किल्ल्याजवळ अशोक स्तंभा जवळ ही घटना घडली आहे.

ट्रक चालकाविरुद्ध वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात एफ आय आर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत सुरेश हम्पन्नावर वय वर्ष 32 रा. मारुती नगर बेळगाव असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

आपल्या मोटरसायकल वरून तो बेळगाव शहरात येत होता त्यावेळी अशोक स्तंभाकडून गांधीनगर कडे जाताना पुढे असलेले बॅरिकेट चुकण्यासाठी गांधीनगरला जाणाऱ्या ट्रक चालकाने चुकीच्या दिशेने ट्रक घातल्याने हा अपघात झाला आहे.

रात्रीच्या वेळी का असेना बॅरिकेड्स असताना देखील चुकीच्या दिशेने गाडी चालवणे चुकीचे आहे त्यामुळे एका ट्रक चालकाच्या हलगर्जी पणामुळे युवकाला जीव गमवावा लागला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.