बेळगाव लाईव्ह : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज दिव्यांग कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडत निदर्शने केली. सरकारने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा दिव्यांग कर्मचाऱ्यांनी दिला.
बेळगावमध्ये गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, त्यांची पदे कायम करावीत या मागणीसाठी न्यू कर्नाटक अपंग मानद निधी कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज आंदोलन करण्यात आले.
२००८ सालापासून मानधनावर सेवा देणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना सरकारच्या सर्व योजना लागू नाहीत. यासारख्या अनेक समस्या दिव्यांग कर्मचाऱ्यांसमोर उभ्या असून
संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांनी तातडीने आमच्या मदतीला धावून आमच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा २६फेब्रुवारीपासून बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क वर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात फकीर गौडा सी. पाटील यांच्यासह न्यू कर्नाटक फाऊंडेशन फॉर दि डिसेबल्डचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.