Saturday, May 4, 2024

/

बेळगाव-गोवा वाहतूक आणखी सुरळीत होणार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव – चोर्ला – गोवा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या भागातील टेकड्यांमुळे या रस्त्याचे एकंदर स्वरूप हरवले असून या रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी करून बेळगाव-गोवा वाहतूक आणखी सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी १.०० वाजता कणकुंबीजवळील चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन केले आहे. पूर्णपणे खराब झालेला बेळगाव-गोवा रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता काळजी करण्याची गरज नाही.बेळगाव-चोर्ला मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात. अशातच बेळगाव-रामनगर-गोवा रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बेळगावहून गोव्याकडे जाणारी जवळपास सर्वच वाहने चोर्ला मार्गावरून धावत आहेत.

या रस्त्याची झालेली दुरवस्था, मोठ्या प्रमाणात असलेली वाहतूक यामुळे दररोज या मार्गावर अपघाताला आमंत्रण मिळत आहे. हि बाब लक्षात घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचा निर्णय घेणार आला असून सतीश जारकीहोळी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे बेळगाव – गोवा प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.Chorla road

 belgaum

काल गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन केले होते त्यावेळी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकी गोळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे तोंड भरून कौतुक केले होते.गेल्या सहा महिन्याच्या काळात आपण गडकरी यांना नऊ वेळा भेटून कर्नाटक राज्याच्या समस्या मांडल्या आहेत निधी देताना त्यांनी पक्ष भेद सोडून मदत केली आहे ते …रस्त्यांचे बादशाह आहेत किंग ऑफ रोडस म्हणत त्यांनी गडकरी यांच्या वर स्तुतीसुमने उधळली होती.

बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी विविध कारणांनी बंद पडलेल्या 9 प्रोजेक्ट समस्या सोडवल्या आहेत आणखी 9 मार्च एंड पर्यंत सोडवू असे त्यांनी म्हटले होते. गुरुवारी गडकरी यांच्या कार्यक्रमानंतर शुक्रवारी त्यांनी रस्ते दुरुस्ती सुरुवात केली आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.