Wednesday, April 17, 2024

/

बेळगाव आणि मनोहर जोशी..

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी सभापती अशा विविध पदावरून कार्यकाळ गाजविणाऱ्या मनोहर जोशी यांचे आज (शुक्रवारी) निधन झाले. यानिमित्ताने सीमाप्रश्न आणि बेळगावशी निगडित त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. मनोहर जोशी यांचे बेळगावशी जवळचे नाते होते. तसेच सीमाप्रश्नी त्यांनी आजवर झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आलेल्या मनोहर जोशींनी आपली राजकीय कारकीर्द उत्तम प्रकारे गाजवली. कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सुरु केलेल्या प्रवासात ८ फेब्रुवारी १९६९ साली झालेल्या महाजन अहवाल विरोधी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. या आंदोलनात त्यांना अटकही झाली.याच आंदोलनात बेळगाव साठी शिवसेनेने ६७ हुतात्मे दिले होते.

सीमाभागात १ नोव्हेंबर काळ्यादिनी देखील त्यांनी उपस्थिती दर्शविली. १९९६ साली मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना पेन्शन लागू करण्यात आली होती. मात्र यादरम्यान शिवसेनेच्या हुतात्म्यांसाहित १९८६ साली झालेल्या आंदोलनातील बेळगावातील हुतात्म्यांनादेखील पेन्शन लागू करण्याचा निर्णय मनोहर जोशी यांनी घेतला होता. सीमाप्रश्नी मनोहर जोशी यांना कमालीची तळमळ होती.Monohar Joshi

 belgaum

लोकसभेत सभापती म्हणून कार्यरत असताना त्यांनी सभागृहातील खासदारांना सीमाप्रश्नासंदर्भात आवर्जून लक्ष देण्याच्या सूचना वेळोवेळी केल्या. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग घेणाऱ्या मनोहर जोशी यांनी शिवसेना आमदार या नात्याने सीमाभागात सीमाप्रश्नी झालेल्या अनेक आंदोलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती दर्शविली आहे.

काळ्या दिनाच्या जाहीर सभेत 2001 झाली बेळगावात महापालिका निवडणूकित बेळगाव शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला ते बेळगावला आले होते बेळगावातील पाटणेकर कुटुंबीयांशी त्यांचे जवळीक होती. सीमा प्रश्नाच्या संदर्भात बेळगाव ची शिष्टमंडळ त्यांना कोहिनूर येथे भेटायला गेले असता ते नेहमी आदरपूर्वक बेळगावच्या लोकांची विचारपूस करत होते आणि चहा बिस्कीट देऊन ‘बेळगाव विषयी’ आपली तळमळ व्यक्त करत होते अश्या या भावना अनेक महाराष्ट्र, एकीकरण समितीच्या नेत्यांनी बेळगाव लाईव्ह कडे त्यांच्याबद्दल बोलून दाखवली व त्यांना आदरांजली वाहिली.

सीमाप्रश्न, सीमाभागाविषयी कमालीची तळमळ दाखविणाऱ्या आणि महाराष्ट्राचे राजकारण गाजविणाऱ्या अशा महान नेत्याला टीम बेळगाव लाईव्ह कडून भावपूर्ण श्रद्धांजली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.